हसणं तुझं
सप्तरंगी इन्द्रधनुष्यासारखं
हृदयाला आनंद देणारं
रुसणं तुझं
पहाटेच्या दवासारखं
क्षणात विरून जाणारं
दिसणं तुझं
वसंतातल्या फुलासारखं
निसर्गाचं सौंदर्य खुलविणारं
बोलणं तुझं
पावसाच्या सरीसारखं
मनाला चैतन्य देणारं
वाक्य तुझं
जन्मभर साथ देण्याचं
मला रात्र-रात्र जागवणारं
पुन्हा तुझंच
परकेपणाचं वागणं
क्षणात पापण्या भिजविणारं
असह्य झालं
आता दिसणं तुझं
माझं मलाचं लाजविणारं
नाही कळलं
प्रेम ते तुझं
नेहमीच मला फसविणारं