Friday, 28 March 2014

निरागस प्रेम

आठवतंय तुला
आपण सागर किनाऱ्यावर 
फिरायला जायचो
दगडावर आपटून
उडणारे तुषार
अंगावर घ्यायचो

आठवतंय आपण
नारळाच्या झाडावर
आपली नावं कोरली होती
आणि कधीही
साथ न सोडण्याची
वचन दिली होती

आठवतंय मला
उशीर झाल्यावर
तू रुसून बसायचीस
आणि कान धरून
माफी मागितल्यावर
खुदकन हसायचीस

आजही सगळं 
आठवल्यावर
किनाऱ्यावर जातो फिरण्यासाठी
तुझे आवडणारे
ते चमकीचे
शिंपले गोळा करण्यासाठी

तू मला दिलेल्या
प्रेमपत्राचं अजून
कव्हर सुद्धा फाटलं नाही
माझं निरागस
प्रेम तोडताना तुला
काहीच कसं वाटलं नाही

No comments:

Post a Comment