Thursday, 19 May 2011

सहजच

लिहावी कविता तुझ्यावर पण
शब्दच मिळत नाही.

पत्र लिहायचं ठरवलं पण
सुरुवातच मिळत नाही

भेटून तुला सांगाव पण
धैर्यच मिळत नाही

विसरून जायचं ठरवलं पण
तो क्षणच जळत नाही

करावा काही विरंगुळा पण
काटाच पळत नाही

प्रेमात बनलो चातक तरी
तुला काहीच कस कळत नाही.

No comments:

Post a Comment